घरमहाराष्ट्रनाशिकनऊ दिवसांच्या बाळासह मासिक बैठकीला महिला सरपंचाची उपस्थिती

नऊ दिवसांच्या बाळासह मासिक बैठकीला महिला सरपंचाची उपस्थिती

Subscribe

मायदरा ग्रामपंचायत सरपंच पुष्पा बांबळेंकडून जनतेची सेवा

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ पुष्पा साहेबराव बांबळे यांनी आपल्या नऊ दिवसाच्या लहान बाळासह ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थिती दर्शवली. मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ पुष्पा साहेबराव बांबळे या एका मुलीला जन्म देऊन नऊ दिवसांपूर्वीच बाळंत झाल्या असून मंगळवार ता.२९ दरम्यान ग्रामपंचायतची मासिक मीटिंग अजेंडा देऊन आयोजित करण्यात आली होती. या मासिक मिटींगला सरपंच पुष्पा बांबळे यांनी आपल्या नऊ दिवसाच्या गोंडस मुलीसह ग्रामपंचायत मासिक मिटींगला सामाजिक अंतर राखत उपस्थित राहिल्या. या मासिक मीटिंगमध्ये सरपंच बांबळे यांनी गाव विकासाच्या दृष्टीने गावातील पाणी पुरवठा, लाईट प्रश्न, दलित वस्तीतील मंजूर पथदीप विकास कामे, घरकुल योजने संदर्भात सविस्तर माहिती यासह गावातील शिवार रस्ते या प्रश्नासंदर्भात आढावा घेत त्यांनी गाव विकासाची कामे मीटिंगमध्ये मांडली. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक नितीन हेंबाडे, ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रभागा बहिरु केवारे, ग्रामपंचायत सदस्य लंकाबाई बांबळे, गंगाराम करवंदे आदींसह ग्रामस्थांनी सरपंच पुष्पा बांबळे यांचे स्वागत करून अभिनंदन केले. दरम्यान एक लोकप्रतिनिधी या नात्याने गावातील ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे त्यांचे विविध प्रश्न शासन स्तरावर मांडणे हे माझं कर्तव्य समजते असे यावेळी सरपंच पुष्पा बांबळे यांनी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच सौ पुष्पा साहेबराव बांबळे, उपसरपंच चंद्रभागा बहिर केवारे, लंकाबाई विठ्ठल बांबळे, गंगाराम करवंदे, साहेबराव बांबळे, बहिरु केवारे, ग्रामविकास अधिकारी नितीन हेंबाडे, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख धोंगडे, रंगनाथ लोहकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मी जबाबदारीने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करीत आहे. विकास कामाचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते हे नुसतं आश्वासन न राहता गावाचा सर्वांगीण विकास साधने या दृष्टिकोनातून आपण एक समाजाचं देणं आहोत म्हणून सरपंच या नात्याने गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी नऊ दिवसांच्या मुलीसह ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थित राहिले ते मी माझे कर्तव्यच समजते
– पुष्पा साहेबराव बांबळे, सरपंच

सरपंच पुष्पा बांबळे या आपल्या नऊ दिवसांच्या बाळासह ग्रामपंचायत मासिक मिटींगला हजर राहून त्यांनी गावातील विविधांगी विकासात्मक कामे मीटिंगमध्ये मांडलीत. मासिक मिटींगला सरपंचांनी दर्शविलेली उपस्थिती ही आदर्शवत प्रेरणा देणारी आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
– नितीन हेंबाडे, ग्रामसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -