घरमहाराष्ट्रनाशिक'माझ्या पोस्टवर कमेंट का केली' अस विचारत केली बेदम मारहाण

‘माझ्या पोस्टवर कमेंट का केली’ अस विचारत केली बेदम मारहाण

Subscribe

फेसबूक पोस्टवरुन टोळक्यांची मारहाण

नाशिक : दोन वर्षापूर्वी फेसबुकवर पोस्ट केल्याच्या रागातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना इंदिरानगरला शरयू नगरी परिसरात घडली. टिल्ल उर्फ कृष्ण धोंगडे (रा. कुन्हे बेलगाव, इगतपुरी) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शरयुनगरी भागातील हॉटेल पेरुचा वाडासमोर विकास कचरु डुकरे (२९, लॅम रोड) हा रात्री साडे आठला मोबाईलवर मित्राशी बोलत असताना टिल्लू व त्याचे दोन साथीदार आले. टिल्लने विकासला हटकले व दोन वर्षापूर्वी फेसबुकवर कमेंट टाकून माझी बदनामी का केली असे म्हणत फायटरने मारहाण केली. त्यावेळी त्याच्या सोबतच इतर दोघांनी लाथाबुक्याने मारहाण करीत, बेदम मारहाण केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक हादगे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -