घरक्राइमख्रिसमस सजावटीवरुन दोन गटात हाणामारी

ख्रिसमस सजावटीवरुन दोन गटात हाणामारी

Subscribe

ख्रिसमस सजावटीच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना बेथल नगर चौक, शरणपूर रोड, नाशिक येथे घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
रोहित नेवारे यांच्या फिर्यादीनुसार, ख्रिसमसनिमित डेकोरेशनच्या कारणावरुन कुरापत काढून हर्षद पाटणकर, अजय पाटणकर, अक्षय पाटणकर यांनी मारहाण केली. अजय पाटणकर यांनी धारदार चाकूने वार केले. त्यात ते जखमी झाले.
अक्षय पाटणकर यांच्या फिर्यादीनुसार, ख्रिसमसनिमित्त डेकोरेशनचे काम असताना रोहन भंडारी याने वर्गणीच्या नावाखाली अक्षय यास शिवीगाळ व मारहाण केली. रोहन व रोहित नेवारे यांनी डेकोरेशन साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले. त्यात अक्षय व अजय पाटणकर जखमी झाले.

ऑफिसचे कुलूप तोडून अतिक्रमण

नाशिक : कार्यालयाचे कुलूप तोडून टोळक्याने अतिक्रमण केल्याची घटना रंगरेज मळा, इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी आरिफ पटेल यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित समीना जावेद रंगरेज, जावेद रंगरेज, सोनू शेख व जावेद अन्वर रंगरेज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरिफ पटेल हे त्यांच्या ऑफिसमध्ये नसताना संशयितांनी कुलूप तोडून आत घुसले. संशयितांनी साहित्याची तोडफोड करत अतिक्रमण केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. बोंडे करत आहेत.

- Advertisement -

जुन्या भांडणातून टोळक्याची मारहाण

जुन्या भांडणातून टोळक्याने दोन तरुणांना मारहाण केल्याची घटना कारगील चौक, दत्त नगर, अंबड येथे घडली. याप्रकरणी मुन्ना संत्री भारती यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित राकेश गौतम व त्यांच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुन्ना भारती व त्यांचा मित्र दिनेश कासार घरात जेवण करत होते. त्यावेळी संशयित घरात घुसले. संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून भारती यांना मारहाण केली. त्यावेळी दिनेश कासार हे मध्यस्ती झाले असता त्यांनाही संशयितांनी मारहाण केली. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.

जुन्या भांडणातून एकाला मारहाण

जुन्या भांडणातून टोळक्याने एका तरुणाला मारहाण केल्याची घटना रॉयल इंटर प्रपयजिस सुराणा चौफुली, नाशिकरोड, नाशिक येथे घडली. याप्रकरणी साहील राजू मांगकाली यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित मेघराज सरोदे, फिराज उर्फ रॉयल बाबा मंडपवाले, फिरोज बाबा यांचे वदील अकबर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मांगकाली यांच्या मित्राशी आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून संशयितांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यात ते जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एस. बटुळे करत आहेत.

- Advertisement -

गळफास घेत तरुणाची आत्महत्या

राहत्या घरी तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना अंबडमध्ये घडली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. योगेश नानाभाऊ मोरे (वय १९, रा. अंबड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, योगेश याने राहत्या घरी आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -