घरक्राइमशेकोटी पेटवण्याच्या वादातून दोन गटात राडा

शेकोटी पेटवण्याच्या वादातून दोन गटात राडा

Subscribe

बजरंगवाडी येथील घटना; एकाला अटक

शेकोटी पेटविण्याच्या वादातून दोन गटात राडा झाला असून, तीनजण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.२८) सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान बजरंगवाडीतील शनी चौकात घडली. विशेष म्हणजे, हाणामारीत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बजरंगवाडी येथील संशयित प्रविण पिठे (वय १९) यास अटक केली आहे.

रूपेश पिठे याने दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास रुपेसश मित्र रोहित जाधव व प्रविण पिठे यांच्यासमवेत चौकात शेकोटी पेटवून शेकत होते. त्यावेळी सुरेश वसराम परमार (वय ३५), संजय विनोद परमार (वय २८) व अर्जुन दुधा वाघिला (वय ५०) यांनी तिघांना गाठले. यावेळी संशयितांनी शेकोटी पेटविण्याच्या कारणातून तिघा मित्रांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत सुरेश परमार याने तक्रारदार पिठे याच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने तो जखमी झाला आहे.
संजय परमार याने दिलेल्या तक्रारीनुसार, संजय पर

- Advertisement -

मार हे मित्र सुरेश परमार व अर्जुन वाघेला यांच्यासमवेत शनी चौकात शेकोटी पेटवून शेकत होते. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलांसह प्रविण पिठे याने शेकोटी का पेटविली, या कारणातून वाद घातला. तिघांनी शिवीगाळ करीत संजय परमार यांच्यासह दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. संशयित प्रविण पिठे याने परमार व अर्जुन वाघिला या दोघा मित्रांना ठार मारण्याची धमकी देवून बांबूच्या काठीने मारहाण केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रवीण पिठे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार घुगे व माळोदे करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -