Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक Oxygen leak at hospital in Nashik: अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा...

Oxygen leak at hospital in Nashik: अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी झालेली ऑक्सिजन गळती आणि त्यामुळे २२ रुग्ण दगावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑक्सिजन गळतीस हलगर्जीपणा कारणीभूत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे FIR मध्ये म्हटले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हलगर्जीपणा करत इतरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी भादवी ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये या गुन्हाची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

नाशिक शहरात महापालिकेचे झाकीर हुसेन रुग्णालय आहे. हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी जीवदान ठरत आहे. मात्र ऑक्सिजन पुरवठा आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत राहिले आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटले. त्यामुळे ही ऑक्सिजन गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. ऑक्सिजनची गळती झाल्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

या रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लीटर ऑक्सिजन वाया गेले. यावेळी अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील १५० लोक व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी २२ जणांचा तडफडून मृत्यू झाला. यात ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. ही गळती झाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. जवळपास एक ते दीड तासानंतर ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला ही गळती रोखण्यास यश आले.

- Advertisement -