घरताज्या घडामोडीआरोग्य विभागातील रिक्त 926 पदे भरा

आरोग्य विभागातील रिक्त 926 पदे भरा

Subscribe

जिल्हा परिषद अध्यक्षांची मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

नाशिक : करोनाशी सक्षमपणे लढा देण्यात महत्वाची भूमिका निभावणार्‍या आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व पालक मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवले आहे. राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आरोग्य अधिकारी,कर्मचारी व आरोग्य विभागातील डॉक्टर तथा आरोग्य कर्मचारी करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी अहोरात्र झटत आहेत. करोना बाधित रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना व उपचारात्मक बाबीसाठी महाराष्ट्र राज्यातील रुग्णालयीन डॉक्टर, आरोग्य कर्मचारी काम करत असताना एकप्रकारे स्वतःचे अस्तित्व पणाला लाऊन आपल्या सर्वांच्या भल्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. अशाही परिस्थितीत नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी हे पद रिक्त आहे. सोबत जिल्हा स्तरीय सवर्ग-1 ची आरोग्य विभागाचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, सहाय्यक संचालक कुष्ठरोग ही महत्वाचे सात पदे रिक्त आहेत. याप्रमाणे जिल्हा परिषद अधिनस्त आरोग्य कर्मचारी यांची सवर्ग-3 मधील 2126 मंजुर पदे असून त्यापैकी 1200 पदे भरलेली आहेत, तर 926 पदे रिक्त आहेत. परिणामी नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत आरोग्य कर्मचारी यांच्यावर कामाचा मोठा ताण पडत आहे. तरी करोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक व उपचारात्मक बाबींसाठी नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी यांची संवर्ग-1 ची 7 पदे तसेच जिल्हा परिषद अधिनस्त आरोग्य विभाग संवर्ग-3 ची 936 पदे तात्काळ भरणेबाबत आपले स्तरावरुन कार्यवाही व्हावी. अशी मागणी निवेदनात केली आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -