घरमहाराष्ट्रनाशिकनाईक शिक्षण संस्थेची अंतिम मतदार यादी आज

नाईक शिक्षण संस्थेची अंतिम मतदार यादी आज

Subscribe

११० हरकती; पॅनल निर्मितीच्या हालचालींना वेग

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर चार दिवसांत ११० हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. या हरकतीवर दोन दिवसांत सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी शनिवारी (दि.२९) प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्हाभर विस्तार असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठक घेणार असल्याचे सत्ताधारी पॅनलकडून सांगण्यात आलेले असताना त्यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्याने बिनविरोधचा दिखावा असल्याची टिका विरोधकांकडून सुरू झाली आहे. यातच सत्ताधारी पॅनलने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून सभासदांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी पॅनल विरोधात परिवर्तन पॅनलची घोषणा यापूर्वीच पंढरीनाथ थोरे यांनी केली असून त्यांच्याकडून सभासदांच्या गाठीभेटीचे सत्र सुरू आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२४) जिल्हा भरातील ८ हजार ७७२ मतदारांची प्रारूप यादी जाहीर झाली. या यादीवर चार दिवस सभासदांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या. चार दिवसात एकूण ११० हरकती प्राप्त झालेल्या आहेत. यात प्रामुख्याने नाव, पत्ता बदल, असे आक्षेप आहेत.

- Advertisement -

मृत सभासदांची नावे वगळण्याचे अर्ज प्राप्त झाले आहेत. २८ व २९ जून रोजी प्राप्त हरकती निकालात काढल्या जातील. शनिवारी (दि.२९) सायंकाळी ५ वाजता मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -