घरमहाराष्ट्रनाशिकअखेर जीवन प्राधिकरण विभागाला आली जाग

अखेर जीवन प्राधिकरण विभागाला आली जाग

Subscribe

१६ गाव पाणीपुरवठा संदर्भात दीड महिन्यात निघणार टेंडर

लासलगाव:शहरामध्ये कांद्याबरोबर चर्चेत राहणारा दुसरा विषय म्हणजे पाणीपुरवठा एक ना अनेक कारणांमुळे नेहमी लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा योजना नेहमी विस्कळीत राहत असते या संदर्भात दैनिक आपलं महानगर ने लासलगाव सह १६ गाव पाणी योजना रामभरोसे या मथळ्याखाली दिनांक १ डिसेंबर रोजी बातमी लावताच महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना उशिरा का असेना जाग आली.दि ९ डिसेंबर रोजी लासलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली असता,या बैठकीत एमजेपीचे कार्यकारी उपअभियंता प्रतापराव पाटील व रावसाहेब बिन्नर,शाखा अभियंता बांगरे उपस्थित होते.१६ गाव पाणी पुरवठा योजनेचे येत्या एक ते दीड महिन्यात टेंडर निघणार असल्याची माहिती यावेळी सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली.

लासलगाव सह १६ गाव पाणीपुरवठा योजनेला  पाईप लाईन फूटने, वीजबिल थकल्याने पाणीटंचाईचे संकट अश्या अनेक अडचणींमुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असते. वारंवार पाईपलाईन फुटत असल्या कारणाने लासलगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील त्रस्त झाले आहेत. याच कारणामुळे लासलगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.याबाबत वृत्तपत्रांत बातमी प्रकाशित होताच जीवन प्राधिकरण यांच्या अधिकार्‍यांनी लासलगाव ग्रामपालिकेत बैठक घेऊन १६ गाव पाणी पुरवठा योजनेचे येत्या एक ते दीड महिन्यात टेंडर निघणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल शेख, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, मंगेश गवळी, जी.टी. खैरनार, शशिकांत कदम उपस्थित होते.

लासलगाव सह सोळा गाव पाणी योजनेची जीर्ण झालेली पाईप लाईन वारंवार लिकेज होत असल्याने होणारा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पालकमंत्री. ना. छगनराव भुजबळ यांचे विशेष प्रयत्नाने जीर्ण पाईप लाईन बदलनेसाठी साडे सोळा कोटी रुपयांची निविदा निघणार असून पाणी पुरवठा योजना पाईप लाईनचे सर्वेक्षण सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले असुन, येत्या एक ते दीड महिन्यात टेंडर काढण्यात येईल. – जयदत्त होळकर, सरपंच

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -