घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअखेर! विनयनगरमधील 'ते' वादग्रस्त ९ बांधकामे जमीनदोस्त

अखेर! विनयनगरमधील ‘ते’ वादग्रस्त ९ बांधकामे जमीनदोस्त

Subscribe

नाशिक : विनयनगर परिसरातील सर्वे क्रमांक ८६६/१/१ मधील खासगी मिळकतींवर तब्बल ९ अनधिकृत बांधकामांना जमीनदोस्त करण्याची मोठी मोहिम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि नगररचना विभागाच्या वतीने मंगळवारी (दि. ७) राबवण्यात आली. यावेळी संबंधित मिळकती ज्यांच्या ताब्यात होत्या त्यांना अश्रू अनावर झाले होते.

अनेक अनधिकृत बांधकाम धारकांनी महापालिकेच्या विरोधात दावे दाखल केले होते. ते सर्व दावे जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्याआधी नगरविकास विभागामार्फेत प्रथम व अंतीम नोटीस संबधितांना निष्कासन खर्चासह देण्यात आलेल्या होत्या. सदरची मोहीम राबवितांना त्यामध्ये १५ मिळकतींपैकी ९ मिळकती निष्कासीत करण्यात आल्या होत्या. या मिळकती अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी जमीनदोस्त केल्या. मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवण्यात आले. यात एक डी.सी.पी, २ ए.सी.पी, ६ पोलीस निरिक्षक तसेच महिला व पुरुष असा १५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

तसेच महापालिकेसाठी देण्यात आलेला दैनंदीन पोलिस बंदोबस्ताचाही यात समावेश होता. पाच जे.सी.बी, दोन पोकलॅन यांचा वापर करुन ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपआयुक्त़ करुणा डहाळे, सहाही विभागीय अधिकारी, अतिक्रमण पथक तसेच कार्यकारी अभियंता, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

‘नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना या मोहिमेच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. ज्या मिळकती अनधिकृत व विना परवाना असतील त्यांनी स्वत़:हून काढून घ्याव्यात; अन्यथा महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल.’ : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त तथा प्रशासक, नाशिक महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -