आईस्क्रीमसाठी तरुणाला मारहाण करत आर्थिक लूट

crime diary

दहीपूलावरील चांदवडकर लेन भागात टोळक्याने एका तरुणाला दमदाटी करुन त्याच्या मोबाईलमधून आईस्क्रीमचे पैसे ई-वॉलेटद्वारे दुकानदाराला दिले. या दादागिरीबद्दल जाब विचारल्याने पाच जणांनी तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी अक्षय महेश सानप यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित सोनू झगडेसह त्याच्या चार मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२५) रात्री ११ वाजेच्या सुमारास चांदवडकर लेन भागात अक्षय सानप
जात होता. त्यावेळी आईस्क्रिम खात असलेल्या संशयितांनी त्याला अडवले. त्याच्या मोबाईलमधून आईस्क्रिमचे पाचशे रुपये फोनमधून सेंड केले. याप्रकरणी त्याने जाब विचारल्याने पाचजणांनी त्याला बेदम मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरवाडे करत आहेत.

आदेशाचे उल्लंघन; ‘वंचित’च्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा

वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शनिवारी (दि.२६) आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात विनापरवानगी आंदोलन करण्यात आले. पवन पवार, संजय साबळे, अविनाश निरंजन शिंदे, वामनदादा गायकवाड, उर्मिला गायकवाड अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत आमदार बांगर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. पोलिसांची परवानगी न घेता केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पवन पवार, संजय साबळे, अविनाश निरंजन शिंदे, वामनदादा गायकवाड, उर्मिला गायकवाड यांच्यासह इतर १२ पदाधिकारी कार्यकर्त्यांवर पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खैरनार करत आहेत.

अंबड लिंक रोडवर घरफोडी; दागिने लंपास

नाशिक । अंबड लिंक रोडवरील जाधव संकूल भागात चोरट्यांनी घरफोडीत दागिने लंपास केलेे. याप्रकरणी प्रकाश दिंगबर गायकवाड (रा. विठ्ठल मंदिरा शेजारी, जाधव संकूल, अंबड लिंक रोड) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२६) गायकवाड यांच्या बेडरुमचा लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून प्रवेश करत चोरट्याने १५ ग्रॅमची सोन्याची पोत, ७ ग्रॅमचे सोन्याचे टोंगल तोडून सोन्या चांदीचे दागिने असा 47 हजारांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

इंडो पंप कंपनी चोरी; साहित्य गायब

नाशिक । महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाच्या अंबड येथील इंडो पंप कंपनीच्या छताचे पत्रे वाकवून कंपनीत प्रवेश करीत चोरट्यांनी सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नानासाहेब दादा ठाकरे (रा. राजीवनगर, सिडको) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी गुरुवारी रात्रीतून केव्हातरी इंडोपंप कंपनीच्या छताचे पत्रे उचकटून कंपनीत प्रवेश करीत टंगस्टन कार्बाईड रिंग्ज व बुस्ट इत्यादी साहित्य चोरुन नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.

टँकर व ट्रॅक्टर विकून ७७ लाख लांबविले

नाशिक । बनावट स्वाक्षरीकरुन टँकर व ट्रॅक्टर विकून सुमारे ७७ लाख रुपयांना गंडविल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिमा राजेश बोराडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिगंबर मधुकर बोराडे (४४), मधुकर मुरलीधर बोराडे (७६,) (पंचक जेल रोड), रोशन दिलीप जाधव (वय ३५, कळवण रोड, दिंडोरी), विजय तुकाराम नेरे (४५, कोरे नगर, मिलजवळ, धुळे) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौघा संशयितांनी १९ ऑगस्ट २० ते २७ जुलै २१ दरम्यान दसक गावातील एचपीसीएल पेट्रोलं पंपावरसिमा बोराडे यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करुन व बनावट धनादेश देऊन टँकर ट्रॅक्टर विकून ७७ लाखांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोळे करत आहेत.

तडीपार गुन्हेगार गजाआड

नाशिक । शहर पोलिसांनी डिसेंबर महिन्यात एक वर्षांसाठी शहर जिल्ह्यातून तडीपार केलेला गुंड रोहीत ज्ञानेश्वर सोळसे (२२, सरकारनगर, भिमवाडी) याला पोलिसांनी घासबाजारात अटक केली. याप्रकरणी कविश्वर निवृत्ती खराटे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २५) हद्दपार केलेला सराईत भिमवाडीत असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी भद्रकाली त त्याच्या घरी छापा टाकला असता, तो मिळून आला.