घरमहाराष्ट्रनाशिकग्राहक मंचाचा चार बँकांना दंड

ग्राहक मंचाचा चार बँकांना दंड

Subscribe

धनादेश वटविताना खातेधारकांशी संपर्क करुन धनादेश संबंधित व्यक्तीस दिल्याची खात्री करण्याची जबाबदारी पार पाडावी, असा सल्ला ग्राहक मंचाने बँकांना निकालाव्दारे दिला आहे.

शहरातील चार बँकांनी धनादेश वटविताना जबाबदारी पार न पाडल्याने तक्रारदारांच्या खात्यातील रक्कम अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याने धनादेशाची रक्कम दहा टक्के व्याजासह द्यावी. मानसिक व शारीरिक त्रासापोटी ५ हजार रूपये व खर्चापोटी ३ हजार रूपये ग्राहकास द्यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला. प्रत्येक बँकेने धनादेश वटविताना खातेधारकांशी संपर्क करुन धनादेश संबंधित व्यक्तीस दिल्याची खात्री करण्याची जबाबदारी पार पाडावी, असा सल्ला ग्राहक मंचाने बँकांना निकालाव्दारे दिला आहे.

सिडको येथील तक्रारदार गणेशमल जगदिशप्रसाद राठी यांनी येस बँकेचा ८० हजार ८५० रूपयांचा धनादेश मयुरेश प्रोटेन्झ यांच्याकडून घेतलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी मयुरेश प्रोटेन्झ यांचे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा, माटुंगा येथे खाते असल्याने त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा, जेलरोड, नाशिकरोड या शाखेत धनादेश डिपॉझिट केला. त्या धनादेशावरील मयुरेश प्रोटेन्झ यांच्या ऐवजी खाडाखोड करुन प्रिया श्रीराम वाघमारे यांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नाशिक रोडमध्ये डिपॉझिट केला. त्या बँकेने क्लेरिंगसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, शिवाजीनगर, नाशिक पुणे रोड या शाखेत पाठविला व वटविण्यात आला. तक्रारदार राठी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात अर्ज केला. अ‍ॅड. प्रवीण पारख यांनी बाजू मांडली. ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलींद सोनवणे, प्रेरणा कुलकर्णी व सचिन शिंपी यांनी तक्रारदाराची बाजू रास्त मानली. धनादेश बँकेकडे नोंद झाल्यावर त्यातील नावात खाडाखोड होऊन दुसर्‍याच्या नावावर दुसर्‍या बँकेत वटविण्यात आल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला. त्यामुळे ग्राहक मंचाने बँकांना धनादेश वटविताना काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -