Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक अश्लील व्हिडिओप्रकरणी शोरूम मालकावर गुन्हा

अश्लील व्हिडिओप्रकरणी शोरूम मालकावर गुन्हा

Subscribe

शोरुममधून घेतलेल्या कारला बसविलेल्या म्युझिक सिस्टममध्ये अश्लिल व्हिडिओ असल्याप्रकरणी महिलेची तक्रार

नाशिकमधील मायको सर्कल येथील पंचवटी ह्युंदाई शोरूममधून एका महिलेने क्रेटा कार (एमएच १५, जीएल १०२५) खरेदी केली. कारमधील एलईडी स्क्रीन व म्युझिक सिस्टीम नादुरुस्त असल्याने महिलेने दुरुस्तीसाठी शोरूमकडे कार जमा केली. मात्र, शोरूमच्या कर्मचार्‍यांनी महिलेस न विचारता सील नसलेली दुसर्‍या कंपनीची एलईडी स्क्रीन व म्युझिक सिस्टीम बसवली. महिलेने कारमधील एलईडी स्क्रीन व म्युझिक सिस्टीम चालू करताच अश्लील व्हिडीओ सुरू झाला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ह्युंदाई शोरूमचे अमित अमोघो यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वर्षा सातवेकर यांनी एलईडी स्क्रीन व म्युझिक सिस्टीम नादुरुस्त असल्याने शोरूमशी तात्काळ संपर्क साधला. त्यानंतर त्यांना सिस्टिम बदलून देण्यात आली. परंतु त्यांनी कारची पाहणी केली असता अश्लील व्हिडीओ सुरू झाल्या.तसेच मिस्टर ६५२२, अमन लाम्बा या नावाने अकाउंट सेव असल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे तपास करीत आहेत.

चूक यंत्रणा बनवणाऱ्या कंपनीची

- Advertisement -

वर्षा सातवेकर यांनी आमच्याकडून क्रेटा कार खरेदी केली. त्या एक महिन्यानंतर कारची म्युझिक सिस्टीम नादुरुस्त असल्याने आमच्याकडे आल्या. त्यांच्यासमोर त्यांच्या पसंतीने कर्मचार्‍याने सीलपॅक नसलेली म्युझिक सिस्टीम रिसेट करत बसवली. त्या पुन्हा तीन दिवसांनी आमच्याकडे आल्या. कारच्या स्क्रीन व म्युझिक सिस्टीमवर ५ वर्षाने मुलाला अश्लील व्हिडीओ दिसल्याचे सांगितले. याप्रकरणी ग्राहकाला त्रास झाल्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागितली आहे. ही चूक एलईडी स्क्रीन व म्युझिक सिस्टीम बनवणार्‍या कंपनीची आहे. – सुब्रतो रॉय, व्यवस्थापक, ह्युंदाई शोरूम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -