घरमहाराष्ट्रनाशिकरोइंगपटू भोकनळ याच्यावरील गुन्हा रद्द

रोइंगपटू भोकनळ याच्यावरील गुन्हा रद्द

Subscribe

उच्च न्यायालयाचे आदेश, फसवणूक झाली नसल्याचे केले स्पष्ट

राष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने बुधवारी, ३१ जुलैला रद्द ठरविला. नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या आशा भोकनळ यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिसांनी दत्तू भोकनळविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

निकालामुळे मनोबल वाढले आहे

उच्च न्यायालयाच्या निकालामुळे मनोबल वाढले आहे. ऑलिम्पिकसाठी सराव चालू होता आणि आता अधिक जोमाने प्रयत्न करून टोकियो २०२० मध्ये देशासाठी मेडल आणून देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करेल. – दत्तू भोकनळ, आंतरराष्ट्रीय रोइंग खेळाडू

- Advertisement -

एफआयआर मध्ये कायदेशीर तथ्य नाही

दत्तू भोकनळ यांनी रजिस्टर लग्न केल्याचे मान्य केल्याने महिलेची फसवणूक केलेली नाही. त्यांनी हुंडा व पैशांची मागणी केली नाही त्यामुळे त्यांच्या विरोधातील एफआयआर कायदेशीर तथ्य नाही, असा युक्तिवाद न्यायालयात केला असून तो न्यायालयाने मान्य केला आहे. – ऍड. जयदीप वैशंपायन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -