घरमहाराष्ट्रनाशिकआक्रोश आंदोलन करणार्‍या भाजप पदाधिकार्‍यांवर गुन्हे

आक्रोश आंदोलन करणार्‍या भाजप पदाधिकार्‍यांवर गुन्हे

Subscribe

परवानगी नसतांनाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले होते आंदोलन

जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायदा व मनाई आदेश लागू असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली असतानाही भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे शासनाविरोधात गुरुवारी (दि.३) आक्रोश आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भाजपच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेविका स्वाती भामरे, माधुरी पालवे, रोहिणी नायडू अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन न केल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे, असा आरोप करत भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपच्या ओबीसी मोर्चातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा व मनाई आदेश लागू असतानाही आक्रोश आंदोलन केले. आंदोलनासाठी भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही भाजपच्या पदाधिकारी व कर्यकर्त्यांनी आदोंलन केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांवर पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -