चिंताजनक! करोनाचा प्रादुभाव वाढवल्याने रुग्णासह बोगस डॉक्टरवर गुन्हा

मनपा वैद्यकीय अधिका-यांची कारवाई

How to maintain social distance in small hospitals, nursing homes?
प्रातिनिधीक फोटो

 

 

कोरोनाने मालेगावात थैमान घातले असून नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयाशी रुग्ण व डॉक्टरांनी संपर्क साधने अपेक्षित आहे. मात्र, अंबड-सातपूर लिंक रोड परिसरातील रुग्ण व डॉक्टरांनी प्रशासनाशी संपर्क न साधता उपचार सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. करोनाची लक्षणे असतानाही प्रादुर्भाव केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी दोन करोना रुग्णांसह डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, अंबड येथील संजीवनगर भागात एका वृद्ध महिलेला काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अजून एकाला कोरोनाची लागण झाली. त्या महिलेवर परिसरातील एका शिकाऊ डॉक्टरने उपचार केले होते. कोरोनाची लक्षणे असतानाही शासकीय रुग्णालयात दाखल न करता स्वतः उपचार केल्याप्रकरणी डॉक्टर बस्ते यांच्या फिर्यादीवरून अंबड येथील दोन कोरोना रुग्णासह शिकाऊ डॉक्टरवर कोरोनाचा प्रसार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी करीत आहेत.

असा आहे खरा प्रकार

अंबड येथील महिलेचे औषधोपचार आधी तिच्या घराशेजारील डॉक्टरकडे उपचार चालू होते. सदर डॉक्टर स्वतः उपचार करीत असून त्याच्याकडे डिग्री नाही. सदर डॉक्टरच्या पत्नीच्या नावाने लायसन्स आहे. मात्र, ती कधीच क्लिनिकला येत नाही. तरीही सबंधित डॉक्टरची प्रॅक्टीस जोरात सुरू होती.