घरमहाराष्ट्रनाशिकअंबडमधील कंपनीला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान

अंबडमधील कंपनीला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान

Subscribe

रविवारी पहाटेच्या सुमारास घडली घटना

अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत तब्बल एक कोटीहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची घटना घडली.

अमोल इंडस्ट्रीज या कंपनीला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच नवीन नाशिक व अंबड अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कारखान्यातील पाच मोल्डिंग मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे, मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आणि तयार उत्पादन जळून खाक झाले. यात एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे.

- Advertisement -

Fire in Ambad MIDC

अग्निशमन विभागाचे प्रभारी अग्निशमन अधिकारी अनिल जाधव, देविदास चांद्रमोरे, रवींद्र लाड, वाहनचालक इस्माइल काजी, सुनील घुगे, संजय गाडेकर, मोयोद्दीन शेख, अविनाश सोनवणे, एस. के. शिंदे, कांतीलाल पवार यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -