घरताज्या घडामोडीनाशिक जिल्हा न्यायालयातील इमारतीस आग

नाशिक जिल्हा न्यायालयातील इमारतीस आग

Subscribe

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मागील बाजूच्या इमारतीस गुरुवारी (दि.१) दुपारी २.३० वाजेदरम्यान आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केले असून, धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर न्यायालयाच्या परिसरात दिसत आहेत. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश, वकील व पक्षकार असतानाच गुरुवारी दुपारी इमारतीस आग लागली. आग लागल्याची समजताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. न्यायालयातील कर्मचार्‍यांनी अग्निरोधक यंत्राच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीन रौद्ररुप धारण केल्याने आग विझवता आली नाही. इमारतीमधील कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, मोठ्या प्रमाणावर धूर निघत आहे. आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन दलाचे बंब दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -