घरउत्तर महाराष्ट्रदिलासा! फटाके बंदीचा प्रस्ताव फेटाळला

दिलासा! फटाके बंदीचा प्रस्ताव फेटाळला

Subscribe

विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतर महासभेच्या पटलावर आला होता विषय, पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मुख्य सचिवांनीही केली सूचना

विभागीय आयुक्तांनी फटाकेबंदीचे पत्र देत तसा ठराव संमत करण्याचा धरलेला आग्रह आज झालेल्या महासभेने अखेर फेटाळून लावला. त्यामुळे नाशिककरांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे. याशिवाय, या निर्णयामुळे फटाकेविक्रेत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

माझी वसुंधरा अभियानात नाशिकचे नाव कोरण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिवाळीत फटाके बंदीचे पत्र महापालिकेला दिल्याने नाशिककरांची दिवाळी फटाक्यांविनाच जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती. दरम्यान, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने विभागीय महसूल आयुक्तांनी काढलेला फटाकेबंदीचा आदेश मागे घेण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सूचना केली आहे. त्यामुळे फटाकेविक्रेत्यांसाठी स्टॉलची लिलाव प्रक्रिया महापालिकेला पूर्क करता येईल.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -