घरताज्या घडामोडीगोदावरीला पहिला पुर; दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी

गोदावरीला पहिला पुर; दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी

Subscribe

नाशिक : नाशिकच्या गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हयातील धरणसाठयात वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने ऐनवेळी मोठया प्रमाणात पाणी सोडावे लागू नये याकरीता खबरदारी म्हणून सोमवारी सकाळी गंगापूर धरणातून ५ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि आजूबाजूच्या परिसरातून वाहून येणारे पाणी गोदावरीत मिसळत असल्याने गोदावरीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आला आहे. पुराचे पारंपारिक पर्जन्यमापक असलेला दुतोंडया मारूतीच्या कंबरेला पाणी लागले आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने नाशिककरांना दमदार पावसाची प्रतिक्षा होती. राज्याच्या इतर भागात दमदार पाउस सुरू असतांना नाशिकला मात्र फिरवल्याने दिवसेंदिवस धरणसाठा घटत होता. त्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. मात्र जुलैच्या पहिल्या आठवडयापासून संततधार पावसाला सुरूवात झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नांदुरमाध्यमेश्वर, पालखेड डॅमसह इतर काही धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता गंगापूर धरणातून ३ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला.  जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ होऊन ४७ टक्क्यांवर पोहचला आहे. गोदावरी नदीपात्रासह नांदूरमध्यमेश्वर धरणात मोठ्या पाण्याची आवक होत असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व आठ दरवाजे उघडण्यात येवून २७ हजार ८६८  क्यूसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. धरण परिसरात व धरणाच्या खालील भागात होणारया अतिवृष्टीमुळे नाले, ओढे, उपनद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पुराच्या पाण्याचा फुगवटा तयार झाल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्येही पुराचे पाणी शिरले.

- Advertisement -

 – गंगापूरमधून ५५००  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
– कादवा नदीवरील रौळस पिंपरी पुलावरील वाहतूक बंद
– कडवा धरणातून ४१५० क्युसेक पाण्याचा विसर्ग
– त्रयंबकध्ये तीन गावांशी संपर्क तुटला
– पुरामुळे गोदाकाठावर दशक्रिया, श्राध्दविधीही थांबले.
– नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा

धरण विसर्ग (११ वाजेपर्यंत)

गंगापूर ५५०० क्युसेक
दारणा १५०८० क्युसेक
कडवा ४१५० क्युसेक
चणकापूर १४६९७ क्युसेक

सावधानतेचा इशारा

नाशिकसह जिल्हयात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हयात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकणी राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी नाले काठच्या परिसरातील लोकांनी सर्तक राहावे. नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -