घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआधी मैत्री, मग जवळीक अन् धोका; प्रेमाच्या जाळ्यात ओढून मिळवायचा न्यूड फोटो...

आधी मैत्री, मग जवळीक अन् धोका; प्रेमाच्या जाळ्यात ओढून मिळवायचा न्यूड फोटो अन् ब्लॅकमेल

Subscribe

नाशिक : नाशिक शहर सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर महिलांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका तरुणाला गुजरातमधून अटक केली आहे. तो सोशल मीडियावर बनावट प्रोफाईलवरून महिलांच्या संपर्कात यायचा. त्यानंतर चॅटिंगवरून महिलांचा विश्वास संपादन करायचा. प्रेमाच्या जाळ्यात ओढत तो महिलांना न्यूड फोटो काढून पाठवण्यास भाग पाडायचा. त्याआधारे त्याने नाशिक शहरातील एका महिलेसह सुमारे चार महिलांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच तरुणाने उत्तरप्रेशातून वारणासीसह गुजरातमधील सूरत, मोरबीमध्ये राहत असल्याचेही उघडकीस आले आहे.

अंशुमन राजेश पटेल (वय २४, रा. ठी. गवापूर, बेलथर रोड, जि. बलिया, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सायबर पोलीस ठाण्यात मार्च २०२० मध्ये एका महिलेने तक्रार दाखल केली होती. तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली. त्याने महिलेशी ओळख वाढवत विश्वास संपादन केला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिला न्यूड फोटो देण्यास भाग पाडले. फोटो मिळताच अनोळखी व्यक्तीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने तिचे फोटो तिच्या पती व नातेवाईकांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे पाठवून पुन्हा न्यूड फोटो नातेवाईकांना प्रसारीत न करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली. त्याने तिच्याकडे पैसे स्विकारुन वांरवार पैशांची मागणी करुन शिवीगाळ व धमकी दिली. त्याचा त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीताचे नाव व पत्ता तांत्रिक विश्लेषणावरुन निष्पन्न करण्यात आले होते. आरोपी मृत्यूंजय उर्फ अंशुमन राजेश पटेल हा २०२० पासून स्वतःचे अस्तित्व लपवून विविध मोबाईल क्रमांक व सोशल मीडियाच्या बनावट प्रोफाईलवरून महिलेशी संपर्क करुन त्रास देत होता. त्याच्या शोधासाठी तपास पथक राहत्या पत्त्यावर गेले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढला.

संशयित आरोपी मृत्यूंजय पटेल याने स्वतः चे सर्व सोशल मीडिया खाते व मोबाईल क्रमांक बंद केले होते. सायबर पथकाने तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याचा वापर करुन मृत्यूंजय पटेल वाराणसीसह गुजरातमधील सूरत, व मोरबी स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता. तो स्वतःचे राहते ठिकाण सतत बदलत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती.

- Advertisement -

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम सिताराम कोल्हे यांनी तपास पथकाला सूचना दिल्या. पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कोरबु, पोलीस हवालदार किरण जाधव, पोलीस नाईक संतोष काळे, चालक पोलीस शिपाई विकास पाटील यांनी तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याचा वापर करून मृत्यूंजय पटेल यास रंगपारबेला (जि. मोरबी, गुजरात) १९ मे २०२३ रोजी अटक केली. त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासादरम्यान त्याने ४ ते ५ महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांना शारिरीक व मानसिक त्रास दिल्याचे समोर आले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे न्यूड फोटो नातेवाईकांना पाठवणर्‍या आरोपीस नाशिक शहर सायबर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक व कौशल्याचा वापर करून गुजरातमधून अटक केली. सोशल मीडियाच्या आहारी न जाता अनोळखी प्रोफाईलवर जावून चॅट करू नये. आपली वैयक्तीक माहिती व फोटो पाठवू नये. अनोळखी व्यक्ती ब्लॅकमेल करत असेल तर तात्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. : प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हे, नाशिक शहर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -