घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपहिल्या महिला हवाई सैन्य अधिकारी 'अभिलाषा'

पहिल्या महिला हवाई सैन्य अधिकारी ‘अभिलाषा’

Subscribe

लढाऊ विमान चालकाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 37 अधिकाऱ्यांना 'एव्हिएशन विंग्स ' प्रदान

नाशिक : नाशिकरोड येथिल कॉम्बॅट एव्हिएटर्स ट्रेनिंग (कॅट्स) स्कूलमधुन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या ३७ अधिकाऱ्यांना कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनण्यासाठी प्रतिष्ठित ‘ एव्हिएशन विंग्स’ प्रदान करण्यात आले. भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलटने प्रतिष्ठित एव्हिएशन विंग मिळाल्याने आर्मी एव्हिएशन साठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन आर्मी एव्हिएशनचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांनी केले.

अभिलाषा बराक भारतीय सैन्यदलात देशातील पहिली महिला हवाई सैन्य अधिकारी पदी विराजमान झाल्या आहेत. अभिलाषा यांना सन्मानाचे ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना फ्लेडलिंग ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने 35 गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. 2019 मध्ये भारताचे माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रतिष्ठित राष्ट्रपतींचे ‘कलर्स’ प्रदान करण्यात आले होते. आर्मी एव्हिएशन हे निर्विवादपणे एक शक्तिशाली शक्ती गुणक आहे, एक प्रमुख लढाऊ सक्षम आणि भारतीय लष्कराची एक महत्त्वाची लढाऊ शाखा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -