घरताज्या घडामोडीफिटरने केला ट्रॅक्टरचा अपहार

फिटरने केला ट्रॅक्टरचा अपहार

Subscribe

ट्रॅक्टरची परस्पर विक्री करुन एकाने ट्रॅक्टरमालकाचा अपहार केला. याप्रकरणी प्यारेलाल नजीर मन्सुरी (रा. पखालरोड) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित फिरोज शेख उर्फ मुन्ना फिटर (35, रा. सादिकनगर, वडाळागाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रॅक्टर दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने फिरोज शेख हा प्यारेलाल मन्सुरी यांच्या घरी आला. त्यांच्याकडील ट्रॅक्टर तो घेवून गेला. त्यानंतर त्याची परस्पर विक्री केली. ही घटना 24 जानेवारी 2017 ते 26 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली. प्यारेलाल यांनी त्याच्याकडे वारंवार मागणी करुनही ट्रॅक्टर दिला नाही. त्याने विश्वासघात केल्याचे लक्षात येताच प्यारेलाल यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करत आहेत.

विवाहितेचा विनयभंग

पतीच्या मोबाईलवर कॉल करत एकाने विवाहितेस अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना बोरगड येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मुकेश बाबूराव शिंदे (रा.शाहूनगर, उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुकेश शिंदे याने पीडित महिलेच्या पतीच्या मोबाईल कॉल केला. महिलेस अश्लील शिवीगाळ केली. तु उस्मानाबादला ये, आपण एकत्र माझ्या रुमवर भेटू असे म्हणत त्याने महिलेचा विनयभंग केला. पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करत आहेत.

- Advertisement -

ऑनलाइन ३० हजारांना गंडा

बँक खात्यासह ओटीपी क्रमांक मिळवत हायटेक भामट्याने एकाला २९ हजार ९९९ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी गिरीश भास्कर देशपांडे यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, पेटीएमचे केवायसी बंद झाले आहे, असे भासवत हायटेक भामट्याने ते चालू करण्यासाठी देशपांडे यांना युनियन बँकेचा १६ अंकी खातेक्रमांक, तीनअंकी सीव्हीव्ही क्रमांक व ओटीपी क्रमांक विचारला. त्याच्यावर विश्वास ठेवत देशपांडे यांनी ओटीपीसह इतर क्रमांक त्यास सांगितले. ते मिळताच भामट्याने त्यांच्या बँकखात्यातून २९ हजार ९९९ रुपये लंपास केले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करत आहेत.

नवव्या मजल्यावरुन पडल्याने महिला ठार

इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने महिला ठार झाल्याची घटना बापू पुलाजवळील सुयोजित गार्डनमधील इमारतीत घडली. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अनिता तुळशीराम साहु (२४, रा.सुयोजित ग्रुप, गंगापूर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बापू पुलाजवळील सुयोजित गार्डनमधील इमारतीच्या नवव्या मजल्यावर अनिता साहु काम करत होत्या. तोल जाऊन त्या खाली पडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. कामगारांनी त्यांना उपचारार्थ राजीव गांधी भवनसमोरील स्पंदन रुग्णालय दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार पठाण करत आहेत.

- Advertisement -

गळफास घेवून एकाची आत्महत्या

घराच्या बेडरुममध्ये एकाने गळफास घेवून आत्महत्या केली. प्रशांत काशीनाथ वाघ (३६, रा.काठेगल्ली, व्दारका) असे मृताचे नाव आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत वाघ याने राहत्या घरातील बेडरुममध्ये छताच्या हुकास दोरी लावून गळफास घेतला. ही बाब कुटुंबियांना समजताच उपचारार्थ त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार दळवी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -