Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक रविवारपासून नाशिक-इंदूर विमानसेवा

रविवारपासून नाशिक-इंदूर विमानसेवा

प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास निरंतर सेवा होणार सुरू

Related Story

- Advertisement -

ओझर विमानतळाहून हवाईसेवेचा विस्तार होत असून कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने पुन्हा एकदा हवाईसेवेला प्रारंभ झाला आहे. या सेवांना प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता आता स्टार एअर कंपनीने १८ जुलैला एक दिवसासाठी प्रायोगिक तत्त्वावर नाशिक-इंदूर हवाईसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास निरंतर सेवा सुरू होणार आहे.

जानेवारी व फेब्रुवारीत ओझर विमानतळावरून सुरू झालेल्या हवाई सेवेने अठरा हजार प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवून विक्रम केला होता. परंतु मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारच्या नागरी हवाई मंत्रालयाने सर्व प्रकारच्या विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता टप्प्याटप्याने पुन्हा सेवा सुरू होत आहे. २ जुलैला स्टार एअरवेज कंपनीची बेळगाव-नाशिक सेवा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी ट्रू-जेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद सेवा सुरू झाली. त्याच्या आदल्या दिवशी एअर अलायन्स कंपनीची नाशिक-अहमदाबाद-दिल्ली व नाशिक-पुणे-बेळगाव हवाई सेवा सुरू झाली. आता स्टार एअर कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर नाशिक-इंदूर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांच्या मागणीनुसार एक दिवसासाठी सेवा असेल. प्रतिसाद मिळाल्यास निरंतर सेवा सुरू केली जाणार आहे. रविवारी (ता. १८) सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी इंदूरहून विमानाचे उड्डाण होईल. ओझर विमानतळावर ते सायंकाळी साडेसहाला पोहचेल. बंगळुरू, कोलकाता आणि इंदूर या तीन शहरांना जोडणार्‍या होपिंग विमानसेवेने नाशिकला जोडण्याबाबतही विमान कंपन्यांकडून विचार सुरू आहे.

- Advertisement -