घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात नायलॉन मांजा विक्रेता तडीपार

नाशकात नायलॉन मांजा विक्रेता तडीपार

Subscribe

राज्यात प्रथमच मांजा विक्रेत्यांवर मोठी कारवाई;पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची कारवाई

नाशिक : शहरात नायलॉन मांजा व चायनीज मांजावर बंदी असताना साठा, विक्री आणि वापर केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी विक्रेत्यास ३१ जानेवारी २०२२ पर्यंत नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. नाशिक शहरात पहिल्यांदाच मांजा विक्रेत्यास तडीपार करण्यात आल्याने मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. निशांत किशोर सोनकर (रा. महाराणा प्रताप चौक, नाशिक) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे.

नायलॉन मांजा पक्षी व नागरिकांसाठी जीवघेणा आहे. मांजामुळे अनेक पक्षी व नागरिकांचा बळी गेला असून, शेकडो पक्षी व नागरिक जखमी झाले आहेत. यंदा मकर संक्रांत निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत नायलॉन मांजासह काचेची कोटींग असलेला व टोकदार चायनीज मांजाची निर्मिती, विक्री, साठा व वापर करण्यास बंदी घातली आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी वापर करणार्‍यांविरोधात तडिपारीची कारवाई करण्याचा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी निशांत सोनकर याच्या विरोधात तडीपारीची कारवाई केली आहे. नाशिक शहर परिसरात नॉयलॉन मांजाचा वापर करू नये, तसेच कोणी साठा करून विक्री करत असेल तर माहिती देण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी केले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -