घरताज्या घडामोडीदिलासादायक : पहिल्यांदाच एकाही रुग्णाचा दिवसभरात मृत्यू नाही; २४ तासांत २४४ नवे...

दिलासादायक : पहिल्यांदाच एकाही रुग्णाचा दिवसभरात मृत्यू नाही; २४ तासांत २४४ नवे रुग्ण, ४१८ कोरोनामुक्त

Subscribe

नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची कमी होत असून, रविवारी (दि.१) दिवसभरात २४४ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण ८४, नाशिक शहर १५४, मालेगाव ४ आणि जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. २४ तासांत ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे, सहा महिन्यात पहिल्यांदाच दिवसभरात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आजअखेर ३ लाख ३३ हजार ४५१ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ९३ हजार 9१५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून २ लाख ३९ हजार १७७ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून एकट्या नाशिक शहरातही ९४ टक्के आहे. जिल्ह्यात ९३ हजार ९१५ रुग्ण पॉझिटिव्ह असले तरी ८८ हजार ४२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ३ हजार ८२१ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १ हजार १६५, नाशिक शहर २ हजार ५१७, मालेगाव १२४ आणि जिल्ह्याबाहेरील १५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ८८५ संशयित रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले. यात जिल्हा रुग्णालय ५, नाशिक महापालिका रुग्णालये ८५४, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ९, मालेगाव महापालिका रुग्णालय ६, नाशिक ग्रामीण रुग्णालयात ११ दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -