घरक्राइमजमिनीच्या हव्यासापोटी त्याने काढला चुलत्याचाच काटा; पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल

जमिनीच्या हव्यासापोटी त्याने काढला चुलत्याचाच काटा; पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल

Subscribe

दिंडोरी : पोलीस पाटील अंबादास शंकर पाटील यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पुतण्याने शेतजमीन वाटप आणि कौटुंबिक वादाला कंटाळून पाटील यांच्या हत्येची ७० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकाला 10 हजार रूपयाचे बक्षीस जाहीर करून अभिनंदन केले. संदिप केंग (रा. कृष्णगाव), भावेश भवर, समाधान उर्फ सागर धुळे (रा. वागळुद ता. दिंडोरी), रोशन पाटील अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पोलीस पाटील अंबादास पाटील हे 18 ऑगस्ट रोजी कुरणात गुरे चारत असताना तीन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केला होता. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन इसमा विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने परिसरात घबराट पसरली होती. ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींना जेरबंद करण्याची मागणी केली होती. मात्र, कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांपुढे गुन्हा तपासाचे मोठे आव्हान होते.

- Advertisement -

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवण अमोल गायकवाड, दिंडोरी चे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या पथकास सूचना देण्यात आल्या. या पथकाने गुप्त बातमीदार तसेच गुन्हयाचा तांत्रिक तपास करून गोरक्षनाथ मुधकर शेखरे (वय 31, रा. कादवानगर दिंडोरी, ता. दिंडोरी), अविनाश राजेंद्र ढिकले (वय 22, रा. भगवा चौक दिंडोरी, ता. दिंडोरी), सागर शंकर भवर (वय 20, रा. सरकारी दवाखाना मागे दिंडोरी ता. दिंडोरी) यांना ताब्यात घेतले. तिघांची कसून चौकशी केली असता संदीप केंग (रा. कृष्णगाव), भावेश भवर, समाधान उर्फ सागर धुळे (रा. वागळुद ता. दिंडोरी) यांची नावे समोर आली. त्यांना वणी पोलीस ठाण्याच्या मदतीने तपासकामी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता सागर धुळे हा निळवंडी गावातील रोशन पाटील याचे शेतामध्ये मजुरीसाठी आला होता. त्यावेळी रोशन पाटील याने त्याचे चुलते अंबादास पाटील, पोलीस पाटील निळवंडी यांचे सोबत असणारे शेतजमीन वाटप व कौटुंबिक वादाला कंटाळुन पोलीस पाटलाचा काटा काढण्यासाठी आणि जमले तर त्याला जिवे ठार मारण्यासाठी तुझ्याकडे कोणी गुंड प्रवृत्तीचे माणसे आहेत का? हे काम केले तर मी तुम्हाला 70 हजार रुपये देईन, असे सागर धुळेला बोलला होता. त्यानंतर सागर धुळे याने मित्रांच्या मदतीने कटकारस्थान रचून नियोजनपुर्वक अंबादास पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. पोलिसांनी संदीप केंग, सागर धुळे, भावेश भवर, रोशन पाटील यांना अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -