घरमहाराष्ट्रनाशिकश्रीगोंद्यात माजी नगराध्यक्षांची आत्महत्या

श्रीगोंद्यात माजी नगराध्यक्षांची आत्महत्या

Subscribe

‘घात की अपघात;चर्चानां उधाण

श्रीगोंदा : येथील नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा श्यामला मनोज ताडे यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या पुढील तपास सुरू आहे.

श्रीगोंदा शहराचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे (वय ४०) यांचा मृतदेह राहत्या घरी गळ्याभोवती साडी गुंडाळलेला अन् पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. २० डिसेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. किरण दगडू ताडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यास कळवले. मिळालेल्या माहितीनुसार श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्षे नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या.

- Advertisement -

अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या. ही घटना धनश्री अपार्टमेंट, श्रीगोंदा येथे त्यांच्या राहत्या घरात घडली. पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांनी या घटनेनंतर अकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस कर्मचारी खारतोडे हे तपासी अधिकारी आहेत. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास चालू आहे.

गुन्हा दाखल होण्याची शक्यता

माजी नगराध्यक्षा श्यामल ताडे यांच्या मृत्यूबाबत नातेवाईक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

घात की अपघात ?

माजी नगराध्यक्ष ताडे यांच्या मृत्यूबाबत मोठ्या प्रमाणात शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय झाले, हे पोलीस तपासात समोर येईल. मात्र सध्या सर्वत्र ‘घात की अपघात?’ असे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -