घरमहाराष्ट्रनाशिकमालेगावी अर्भक पुरताना चौघे ताब्यात

मालेगावी अर्भक पुरताना चौघे ताब्यात

Subscribe

मालेगाव-मनमाड रस्त्यावरील राजस्थान हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत अर्भक पुरल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना सोमवार, २१ जानेवारीला दुपारी घडली. सर्व संशयित पुण्यातील असून, ते कौळाणे येथील एका डॉक्टरकडे गर्भपातासाठी आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेमुळे अवैध गर्भपाताचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

गर्भपातानंतर अर्भक पुरण्यासाठी दोन तरुण निर्जनस्थळी आलेले होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना पकडले व त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपातासाठी मदत करणारा डॉक्टरदेखील उपस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेतील संशयित दोन तरुणींना पोलिसांनी मनमाड चौफुली येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले असून, डॉक्टरचा शोध सुरू आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे पथक दाखल झाले होते. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. हा सर्व प्रकार संशयास्पद असून, हे तरुण-तरुणी पुण्याहून मालेगावी का आले, गर्भपाताचे मूळ कारण काय, याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळावरुन पोलिसांच्या उपस्थितीत पुरण्यात आलेले अर्भक बाहेर काढण्यात आले. या वेळी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Malegaon1
या ठिकाणी अर्भक पुरण्यात आले

तरुणी म्हणते देवदर्शनासाठी आलो 

एका जोडप्यासह आम्ही भोसरी येथून वणी येथे दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेऊन पायऱ्या उतरताना धक्का लागल्याने गर्भाला इजा झाली. जीवाला धोका असल्याने कौळाणे येथे पोहोचत गर्भपात केल्याचे संबंधित तरुणीने आपली बाजू मांडताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -