घरमहाराष्ट्रनाशिकमालेगावनजीक अपघातात चौघे जागीच ठार

मालेगावनजीक अपघातात चौघे जागीच ठार

Subscribe

पुणे-इंदूर मार्गावर मनमाड-मालेगाव दरम्यान असलेल्या चोंडी घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास ट्रक व इर्टिगा कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. अपघातातील जखमी ४ जणांवर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे-इंदूर मार्गावर मनमाड-मालेगाव दरम्यान असलेल्या चोंडी घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास ट्रक व इर्टिगा कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. अपघातातील जखमी ४ जणांवर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात चक्काचूर झालेली इर्टिगा कार

इर्टिगा कार (एमएच-११, बीएच-६७४६) अलाहाबाद येथून पुण्याच्या दिशेने, तर ट्रक (एमएच-१८, एए-१३७७) पुण्याकडून येत होती. इर्टिगामधील सर्व जण २१ फेब्रुवारीला प्रयागराज (अलाहाबाद) येथे लग्नसोहळ्यासाठी गेले होते. पुण्याकडे परतताना जळगाव चोंडीजवळ ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतांमध्ये २ महिला आणि २ मुलांचा समावेश आहे. विजित सिंग आणि मृत्यूंजय सिंग हे साडू असून ते आपल्या शालकाच्या लग्नाला गेले होते. यातील विजित सिंग यांची प्रकृती गंभीर असून, जखमींवर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की, इर्टिगा कारचा चक्काचूर झाला. या अपघातानंतर पुणे-इंदूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.दरम्यान, रविवारी सकाळी नाशिकपासून काही अंतरावरील शिरवाडे वणीनजीक झालेल्या भीषण अपघातानंतर काही तासांतच पुन्हा हा अपघात झाल्याने अवजड वाहनांचा प्रचंड वेग, त्यांच्याकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि जिल्ह्यातील ब्लाइंड स्पॉट्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

- Advertisement -

मृतांची नावे अशी…

अंजुसिंग विजित सिंग परमार (२८, नांदेड), ‎शालिनी सिंग मृत्यूंजय सिंग (३०, पुणे), ‎रिद्धी सिंग मृत्यूंजय सिंग (६, पुणे), ‎विरेंद्र विजित सिंग (७, नांदेड)

जखमींची नावे अशी…

विजितसिंग परमार (३५, नांदेड), ‎रितसिंग मृत्यूंजय सिंग (५, पुणे), ‎मृत्यूंजय सिंग नरेंद्र बहादूर सिंग (३५, पुणे), ‎वंश विजितसिंग परमार (दीड वर्ष, नांदेड)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -