घरमहाराष्ट्रनाशिक'स्वाईन फ्ल्यू’ने १० वर्षांत ४०२ जणांचा मृत्यू

‘स्वाईन फ्ल्यू’ने १० वर्षांत ४०२ जणांचा मृत्यू

Subscribe

2313 रुग्णांना ‘एच1एन1’ची लागण; रुग्णांमध्ये वयोवद्ध नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक

राज्यातील मुंबई, पुणे या मेट्रो शहरांमध्ये थैमान घालणार्‍या ‘स्वाईन फ्ल्यू’ या आजाराची नाशिक जिल्ह्याला देखील लागण झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात ‘एच-१ एन-१’ सदृश्य दोन हजार ३१३ रुग्ण आढळले असून, त्यापैकी तब्बल ४०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची प्रकृती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. या अवस्थेत रुग्णांस दाखल करुन घेण्याशिवाय शासकीय रुग्णालयांना दुसरा पर्याय नसल्याने मृतांच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने म्हटले आहे.

पावसाळा सुरु होताच स्वाईन फ्लू आजार डोके वर काढतो. गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील या आजाराने थैमान घातल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. गेल्या दहा वर्षांचा विचार करता 2017 मध्ये सर्वाधिक 87 बळी गेले आहेत. त्यानंतर हे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. मात्र, स्वाईन फ्ल्यू सदृश्य रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नसून वर्षागणिक ते वाढत चालले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रात टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. एखाद्या रुग्णास आवश्यकता भासल्यास त्यांच्या थूंकिची चाचणी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे नमूने पाठवले जातात.

- Advertisement -

चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करुन घेतले जाते. मात्र, बहुतेक नागरीकांचा शासकीय रुग्णालयातील उपचारांवर फारसा विश्वास नसल्याने ते खासगी रुग्णालयाचा आधार घेतात. येथे अनेक दिवस उपचार घेतल्यानंतर कालांतराने या रुग्णांना स्वाईन फ्ल्यूसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झालेला असतो आणि रुग्णाला दाखल करुन घेण्यास नकार देणे शक्य नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. स्वाईन फ्लू सदृश्य आढळलेल्या रुग्णांमध्ये नगर, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यातील रुग्णांचा देखील समावेश होतो. नातेवाईकांकडे किंवा उपचारासाठी नाशिकमध्ये आलेल्या नागरीकांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यास त्याची नाशिकमध्येच नोंद केली जाते.

स्वाईन फ्ल्यू आजाराचे प्रमाण वयोवृध्द्द नागरीकांमध्ये सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. तसेच रोग प्रतिकारक क्षमता कमी असलेल्या व्यक्तींना हा आजार लवकर बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे वयोवृध्द व्यक्ती किंवा 15 वर्षापर्यंतच्या बालकांना याची त्वरीत लागण होते. 2019 या चालू वर्षातील गेल्या साडेसहा महिन्यांत 20 पुरुष व 12 महिलांना स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. तसेच 282 रुग्णांना ‘एच1एन1’ची लागण झाल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -