खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या चार खेळाडूंची निवड

क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या प्रयत्नांना यश

मनमाड : हरियाणा राज्याच्या पंचकुला येथे होणार्‍या चौथ्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शहरातील चार खेळाडू सोबत तांत्रिक अधिकारी म्हणून एका खेळाडूची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली असून एकाच वेळी पांच खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली असल्यामुळे आमदार सुहास अण्णा कांदे सोबत शहरातील इतर खेळाडू,खेळ प्रेमी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त करून निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले

चौथ्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे हरियाणा राज्याच्या पंचकुला येथे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी इतर राज्यातील संघा सोबत महाराष्ट्र संघ देखील सहभागी होणार आहे या संघात शहरातील गुरू गोविंद सिंग हायस्कुल ची विद्यार्थिनी आकांक्षा किशोर व्यवहारे,छत्रे विद्यालयाची संध्या भास्कर सरोदे, मनमाड महाविद्यालयाची धनश्री विनोद बेदाडे,आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर यांची तर आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असून या खेळाडूना क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले आहे एकाच वेळी शहरातील पांच नामवंत खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली असल्याचे कळताच शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्यासह शहरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले

चौथ्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत निवड झालेले खेळाडूंनी या अगोदर देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करून सुवर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेत देखील सर्व खेळाडू उत्तम कामगिरी करून महाराष्ट्रा सोबत मनमाड शहराचे नाव उज्ज्वल करतील असा मला पूर्ण विश्वास आहे.- सुहास कांदे, आमदार