घरमहाराष्ट्रनाशिकखूनप्रकरणी चौघांना जन्मठेप

खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप

Subscribe

२० मे २०१९ रोजी घडली होती घटना

जुन्या भांडणाची कुरापत काढून गोरख मुकुंदा सोनवणे यांचा खून व मुलांना जातीवाचक शिवीगाळ -दमदाटी केल्याप्रकरणी चार आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी शनिवारी (ता.३) जन्मठेप व एक हजार रुपये दंड अथवा सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तळेगाव (ता.इगतपुरी) येथील राजवाड्यात २० मे २०१९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.

सुकदेव मदन कडू (३०, रा.नांदगाव सदो, ता.इगतपुरी), धनराज केरु आडोळे (३०, रा. नांदगाव सदो, ता.इगतपुरी), शिवाजी दिलीप झडे (३१, रा.तळेगाव, ता.इगतपुरी), भरत सोनू चव्हाण (३३, रा.नांदगाव सदो, ता.इगतपुरी) अशी आरोपींची नावे आहेत. कल्पनाबाई गोरख सोनवणे यांचे भाऊ दिनेश त्र्यंबक मनोहर यांच्याशी १९ मे २०१२ रोजी चार जणांचे भांडण झाले. या भांडणाची कुरापत काढून चौघांनी संगनमत करत कुर्‍हाड, लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन २० मे २०१२ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तळेगाव येथील राजवाड्यात कल्पनाबाई गोरख सोनवणे यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. पती गोरख मुकुंदा सोनवणे यांच्या डोक्यावर चौघांंनी हत्याराने गंभीर जखमी करत जीवे ठार मारले. कल्पनाबाईंची मुलगी रोशनी व मुलगा सतीश हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी झाले असता त्यांनाही चौघांंनी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली. घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह हजारी यांनी करून जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

- Advertisement -

खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी केले. या खटल्यात ११ साक्षीदार तपासून न्यायालयापुढे युक्तीवाद करून आरोपींविरुद्ध पुरावा शाबीत केला. खटल्याच्यावेळी पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नि. अ. सैयद व सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. आहेर यांनी खटल्याच्या कामकाजासाठी मदत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -