Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र जमीन देण्याचे भासवून चौघांनी केली डॉक्टरांची ६५ लाखांची फसवणूक

जमीन देण्याचे भासवून चौघांनी केली डॉक्टरांची ६५ लाखांची फसवणूक

Subscribe

नाशिक : नाशिक शहर लगतच्या आनंदवली शिवारात जमीन असल्याचे भासवून चौघांनी नाशिक मधील डॉक्टरांची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या फसवणूक प्रकरणी डॉ. प्रशांत वसंत पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत मध्यस्थी अरुण भागवत पाटील, जगदिश कारभारी गावंड (वर ५१, रा.अंबड), सोमनाथ काशीनाथ मंडलिक (५१), दत्तात्रय काशीनाथ मंडलिक (५०, रा. चेहडी नाका, नाशिकरोड, नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी संगनमत करून कट कारस्थान रचून फिर्यादी डॉ. प्रशांत पाटील व त्यांचे पार्टनर यांना आनंदवली शिवारात त्यांच्या मालकीची जमीन असल्याचे भासवले. डॉ. पाटील यांचा विश्वास संपादन झाल्याचे लक्षात येताच संशयितांनी त्यांना फसवण्याचा षडयंत्र रचायला सुरवात केली. डॉ. पाटील यांना नोटरी, साठेखत करारनामा व भरणा पावती करण्यास सांगितले.

- Advertisement -

त्यानुसार डॉ. पाटील यांनी करारनामा व भरणा पावती करत टप्पाटप्प्याने एकूण ६५ लाख रुपये आरटीजीएस व धनादेशाव्दारे दिले. ही घटना ३० जून २०१५ ते २९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आनंदवली, एसएसके हॉटेल, चांडक सर्कल, नाशिक आणि अ‍ॅड. ए. आय. शेख यांच्या कार्यालयात घडली. पैसे देवूनही जमीन मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे डॉ. पाटील यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, संशयित आरोपींवर गुन्हे आहेत. संशयित जगदीश गावंड, सोमनाथ मंडलिक व दत्तात्रय मंडलिक या तिघांच्या विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार करत आहेत.

जमीन फसवणूक प्रकरणाचा तपास सुरु आहे. फिर्यादी आणि संशयित आरोपींमधील आर्थिक व्यवहारांची पाहणी केली आहे. : नितीन पवार, सहायक पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -