घरमहाराष्ट्रनाशिकमतदार नोंदणीसाठी ४ हजार अर्ज

मतदार नोंदणीसाठी ४ हजार अर्ज

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यकमांतर्गत नवीन नाव नोंदणीसाठी जिल्हाभरातून ४ हजार १८ अर्ज प्राप्त झाले. यात दिंडोरी तालुक्यातून सर्वाधिक ५७६ तर मालेगाव मध्य मतदारसंघातून सर्वात कमी ७५ अर्ज प्राप्त झाले.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी पुनरिक्षण कायर्र्क्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत १ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करणे, दुबार, मयत मतदारांची नावे वगळणे, नावात बदल, पत्ता बदल यासारख्या दुरुस्त्या करण्यात येत आहेत. याकरता शनिवार आणि रविवार दोन दिवस राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत फॉर्म ६ नाव नोंदणी, फॉर्म ७ नाव कमी करणे फॉर्म ८ नावात दुरूस्ती, फॉर्म ८ अ एकाच मतदारसंघात पत्ता बदल याकरता एकूण ६ हजार ७६८ अर्ज प्राप्त झाले. सर्वाधिक अर्ज नवीन नाव नोंदणीसाठी प्राप्त झाले तर दुबार, मयत मतदारांचे नाव कमी करणे याकरता १ हजार ५५४ अर्ज प्राप्त झाले. नावात दुरुस्तीसाठी ९६६ तर पत्ता बदलसाठी २३० अर्ज प्राप्त झाल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले.

- Advertisement -

एकूण प्राप्त अर्जामधे ३७३० पुरुष, ३०३८ महिला मतदारांच्या अर्जाचा सामावेश आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांत मतदान केंद्रावर राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अनेक जागरूक मतदारांनी केंद्रावर येऊन मतदार यादीत नाव आहे की नाही याची खातरजमा केली. तसेच अनेकांनी नाव नोंदणीसाठी अर्जही सादर केले.

तालुकानिहाय प्राप्त अर्ज

नांदगाव २५५, मालेगाव मध्य ७५, मालेगाव बाहय ११०, बागलाण १५०, कळवण ५२१, चांदवड ४१६, येवला २३२, सिन्नर ३८४, निफाड ५३२, दिंडोरी ५७६, नाशिक पूर्व १५२, नाशिक मध्य १८१, नाशिक पश्चिम २०५, देवळाली १२३, इगतपुरी १०६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -