घरताज्या घडामोडीबनावट ओळखपत्राने एसटी महामंडळाची फसवणूक

बनावट ओळखपत्राने एसटी महामंडळाची फसवणूक

Subscribe

राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासामध्ये सवलत देण्याची योजना सुरू केली असली तरी राज्यात अनेकजण बनावट ओळखपत्राव्दारे प्रवास करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. असाचा एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. दुसर्‍याच्या नावे बनावट ओळखपत्र तयार करुन ते खरे असल्याचे भासवत एसटीने प्रवास करणार्‍या एकावर म्हसरुळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संजय पांडुरंग गायकवाड (रा. तिसगाव, ता. देवळा, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासात सवलतीची योजना सुरु करण्यात आली आहे. त्याचा गैरफा

यदा घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारावर बोगस ओळखपत्र मिळवत कमी वयाचेही लोकही योजनेचा लाभ घेत आहेत. राज्यात अशा ओळखपत्रांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. संशयित संजय गायकवाड याने डी. पी. साळुंखे नावाचे एसटी महामंडळाचे बनावट ओळखपत्र तयार केले. ते ओळखत पत्र खरे असल्याचे भासवत तो बुधवारी (दि.11)म्हसरूळजवळील राऊ हॉटेल भागात एसटीतून प्रवास करत असल्याचे आढळून आले. पुढील तपास हवालदार पवार करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -