घरमहाराष्ट्रनाशिकनिराधार मुलांना ‘इस्पॅलियर’ देणार मोफत शिक्षण

निराधार मुलांना ‘इस्पॅलियर’ देणार मोफत शिक्षण

Subscribe

वेगवेगळ्या स्वरूपात मदत करण्याचा शाळेचा निर्णय

कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारंवार निर्बंध लागू करण्यात आले. लॉकडाउनच्या निर्णयामुळे आर्थिक आघाड्यांवर मोठे परिणामही झाले. उद्योग व्यवसायासह सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला. कोरोना महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळे ज्या पालकांचे निधन झाले, त्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलने घेतला आहे. इस्पॅलियर शाळेमधील ज्या पालकांचे छत्र हरपले आहे, अशा मुलांना मोफत शिक्षणासह वेगवेगळ्या स्वरूपात मदत करण्याचा निर्णय शाळेने घेतला आहे. सामाजिक बांधिलकीची भावना जोपासत कोरोनामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेणारी ही पहिली शाळा ठरली आहे.

दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटाने अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. या दोन वर्षांच्या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. एकाच कुटुंबातील आई वडील अशा दोन कर्त्या व्यक्तींचाही मृत्यू झाल्याने या कुटुंबातील मुलांवर मोठे संकटच कोसळले. पालकांचे छत्र हरपलेल्या अशा मुलांना शालेय शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारे अडचणी येऊ नये या हेतूने तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत स्कूलचे प्रमुख सचिन जोशी यांनी संस्थेतील अशा मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संस्थेतील अनेक मुलांना आता संपूर्ण शालेय शिक्षण मोफत मिळणार आहेत. तसेच या मुलांना शैक्षणिक साहित्य, नोटबुक्स, शिकवणी तसेच इतर आवश्यक शैक्षणिक कारणांसाठी येणारा खर्चही इतर पालकांच्या सहकार्याने पूर्ण केला जाणार आहेत.

Sachin Joshiकोरोनाचा सर्वाधिक फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. गेल्या दोन वर्षापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही ऑनलाईनसह वेगवेगळ्या माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. कोविडमुळे ज्या पालकांचे निधन झाले, अशा पालकांच्या मुलांना संपूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
– सचिन जोशी, प्रमुख, इस्पॅलियर स्कूल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -