घरमहाराष्ट्रनाशिकमॉल्समध्ये आता विनाशुल्क पार्किंग

मॉल्समध्ये आता विनाशुल्क पार्किंग

Subscribe

विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे

पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये विनामूल्य पार्कींग करण्याच्या महत्वपूर्ण प्रस्तावास महापौर रंजना भानसी यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता मॉलमध्ये जाताना पार्किंगसाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. पार्किंगसाठी शुल्क आकारणार्‍या मॉल्सला तातडीने नोटीसा बजावण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले. नगरसेविका किरण गामणे आणि नगरसेवक दीपक दातीर यांनी यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर सादर केला होता.

नाशिक शहरात मॉल्सची संख्या वाढत आहे; परंतु सर्वच ठिकाणी पार्कींग शुल्क आकारले जाते. अनेक मॉल्सना महापालिकेने वाहनतळाच्या जागेसाठी चटई क्षेत्र मुक्तची सवलत दिली आहे. मात्र, पार्कींगसाठी शुल्क आकारून संबंधित मॉल्सचालक नियमाचा भंग करतात. अनेक मॉल्समध्ये तर दुचाकी किंवा चारचाकी मोटार प्रवेशाच्या वेळीच शुल्क घेऊन पावती दिली जाते. नंतर ती पावती मॉलमधून बाहेर पडताना परत घेतली जाते. त्यामुळे शासनाच्या कर चोरीचा हा प्रकार असल्याची देखील चर्चा आहे. मॉल्स चालक शुल्क घेत असल्याने अनेक नागरिक मॉलच्या बाहेरच वाहने लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडीदेखील होत असते. दरम्यान, महापालिकेच्या नगररचना अधिनियमात व्यावसायिक आस्थापनांसाठी वाहनतळासाठी जागा सोडणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकांच्या वाहनांचा भार त्यांनीच सांभाळला पाहिजे; परंतु मॉल्स चालक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने निशुल्क वाहनतळ करण्याचा प्रस्ताव सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेविका किरण गामणे आणि दीपक दातीर यांनी सादर केला होता. त्यास सभागृहात मंजुरी देण्यात आली.

- Advertisement -

विनामूल्य सुविधांची उपलब्धता गरजेची

मॉल्समध्ये पार्किंगसाठी वेगळे शुल्क आकारून ग्राहकांना चंदन लावले जात होते. वास्तविक, नियमाप्रमाणे कोणत्याही व्यापारी संकुलाला त्यांच्या ग्राहकांसाठी पार्किंगची विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. या अनुषंगाने मी प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाल्याचा आनंद वाटतो. – किरण गामणे, नगरसेविका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -