पोलीस आयुक्तांची चाईल्डलाईन से दोस्ती!

चिमुकल्यांनी गुलाबपुष देऊन पोलीस आयुक्तांच्या हातावर ‘चाईल्ड हेल्पलाईन से दोस्ती’चा फ्रेंडशिप बँड बांधला. यावेळी बालकांच्या न्याय हक्कांसाठी पोलीस सदैव तत्पर असतात. चाईल्ड हेल्पलाईनसाठी पोलिसांची मदत कायम राहणार आहे, असे आश्वासन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिले.

बालदिनापासून १४ ते २० नोव्हेंबर रोजी बाल हक्क दिनापर्यंत चाईल्ड हेल्पलाईनतर्फे बालकांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन चाईल्ड हेल्पलाईनतर्फे करण्यात आले आहे. बालकांचे प्रश्न सोडवणार्‍या यंत्रणांसोबत चाईल्ड हेल्पलाईनचे मैत्रीपूर्ण संबंध असावेत, यासाठी हेल्पलाईनचे समन्वयक व सदस्य विविध शासकीय यंत्रणांना भेटी देत संवास साधत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्यासोबत ‘चाईल्डलाईन से दोस्ती’ कार्यक्रम चाईल्डलाईन सदस्यांनी घेतला. यावेळी लहान मुलांनी फुल देत आणि ‘चाईल्डलाईन से दोस्ती’चा फ्रेंडशिप बँड पोलीस आयुक्तांच्या हातात बांधला.

नाशिक शहरातील बालकांच्या प्रश्नांवर विशेष करून बाल भिक्षेकरी यांच्या पुनर्वसनाबाबत पोलीस आयुक्तांशी चाईल्ड हेल्पलाईनच्या समन्वयक व सदस्यांनी चर्चा केली. चाईल्डलाईन १०९८ हा केंद्र सरकारचा उपक्रम नाशिकमध्ये मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय आणि नवजीवन फाउंडेशन या संस्थांमार्फत चालवला जात आहे. त्या अंतर्गत ० ते १८ वयातील हरवलेल्या, सापडलेल्या, निराधार, शोषित, अत्याचारग्रस्त, रस्त्यावरील, बालकामगार, बालभिक्षेकरी बालकांसाठी १०९८ ह्या मोफत क्रमांकाची सेवा चालवली जाते.

यावेळी चाईल्डलाईन शहर समन्वयक प्रणिता तपकिरे, केंद्र समन्वयक प्रविण आहेर, सदस्य प्राजक्ता शोभावत, निख्ल पाटील आणि नितीन वानखेडे उपस्थित होते.