घरताज्या घडामोडीफेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला पडली ५२ लाखांत

फेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला पडली ५२ लाखांत

Subscribe

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे एका शिक्षिकेला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवरून ओळख झालेल्या मित्राने शिक्षिकेला परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे सांगून विविध कारणांवरून पैसे मागत तब्बल ५१ लाख ९५ हजार ४८९ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात आयटी अ‍ॅक्ट व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१८ पासून हाटेक भामटा शिक्षिकेसोबत फेसबुकवरुन संपर्कात होता. फेसबुकवरुन दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाली. दोघांची फेसबुकवरुन चांगली ओळख झाली. ओळख वाढल्याने दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक देताच दोघांमध्ये व्हॉट्सअपवरुन चॅटिंग करण्यास सुरुवात केली. परदेशातून भेटण्यास येत आहे, असे सांगून भामट्याने महिलेचा विश्वास संपादन केला. भेटवस्तू गिफ्ट म्हणून पाठवली असून विमानतळावर सीमा व शुल्क विभागाने ती पकडली आहे. भेटवस्तू सोडवण्यासाठी काही पैसे भरावे लागणार आहेत, असे त्याने महिलेस सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत शिक्षिकेने ऑनलाइन पद्धतीने त्याने सांगितल्याप्रमाणे पैसे भरले. अशीच वेगवेगळी कारणे देत भामट्याने शिक्षिकेकडून दीड वर्षात ५१ लाख ९५ हजार ४८९ रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. प्रत्यक्षात त्याने कोणतीही भेटवस्तू दिली नाही किंवा भेटण्यासही आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -