घरमहाराष्ट्रनाशिकग्रामविकास मंत्र्यांकडून आ. खोसकरांची आश्वासनावर बोळवण

ग्रामविकास मंत्र्यांकडून आ. खोसकरांची आश्वासनावर बोळवण

Subscribe

नाशिक : ग्रामविकास विभागाने मुलभूत सुविधांच्या कामांना स्थगिती दिल्यामुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांची तब्बल 5 कोटी रुपयांची रद्द झालेली कामे पुनर्जिवित करण्यासाठी त्यांनी बुधवारी (दि.2) ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेतली. मात्र, आश्वासनाच्या व्यतिरीक्त हाती काहीच न पडल्याने आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समजते.

जिल्हा परिषदेच्या प्रशासनामुळे ही कामे रद्द झाल्याचा आरोप करत आमदार खोसकर यांनी 20 ऑक्टोबर रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांची मनधरणी करत पालकमंत्री दादा भुसे यांना यश आले. परंतु, या प्रकरणाची चौकशी करुन जिल्हा परिषदेला अहवाल सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. त्याआधारे जिल्हा परिषदेने चौकशी अहवाल तयार केला आहे. हा अहवाल घेवूनच आमदार खोसकर बुधवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गेले. त्यांनी आमदार खोसकर यांना कामे पुनर्जिवित करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने खरच ही कामे पुनर्जिवित होतील की नाही, याविषयी खोसकरांना खात्री वाटत नाही. ग्रामविकास विभागाचा आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही कामे रखडलेली राहतील. त्यामुळे आमदारांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. जिल्हा परिषद प्रशासनाकडे या कामांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केलेली असताना केवळ अधिकार्‍यांच्या वेळकाढू धोरणामुळे ही कामे रद्द झाल्याचा आरोप आमदार खोसकार यांनी केला होता. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे बहुतांश कामे ठेकेदारांनी अगोदरच पूर्ण केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -