घरक्राइमपोलिसांत तक्रार दिल्यास काटा काढण्याची धमकी; कोयत्याचा धाक दाखवून लुटणारे गजाआड

पोलिसांत तक्रार दिल्यास काटा काढण्याची धमकी; कोयत्याचा धाक दाखवून लुटणारे गजाआड

Subscribe

कोयत्याचा धाक दाखवून १६ हजार रुपयांचा ऐजव लुटणार्‍या आणि पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास काटा काढण्याची धमकी देणार्‍या टोळक्यास मुंबई नाका पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गजाआड केले. संशयितांनी पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सलमान युसूफ अत्तार (वय २०, दोघेही रा. भारत नगर, झोपडपट्टी, मुंबई नाका) व मोईन सलीम पठाण (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी रात्री 9 वाजता माधव कारभारी वाघ (वय ३२, रा. सिडको) हे मित्राला सोडून दीपालीनगर परिसरातून जात होते. यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी वाघ यांना अचानक आडवले. त्यातील एकाने धारदार कोयत्याचा धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. तिघांनी वाघ यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम व कानातील बाळी असा एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास काटा काढण्याची धमकी चौघांनी दिली. धमकीला बळी न पडता वाघ यांनी याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाच्या बाजूला असलेल्या भारत नगर झोपडपट्टीतून सलमान युसूफ अत्तार (वय २०) व मोईन सलीम पठाण (वय २०) या संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांना तक्रारदारासमोर समक्ष उभे केले असता त्यांनी ओळखल्यानंतर पुढील चौकशी करण्यात आली. त्यात संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisement -

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस हवालदार रोहिदास सोनार, सोमनाथ डोंगरे, भरत डंबाळे, युवराज गायकवाड, आप्पासाहेब पानवळ, योगेश पवार, अनिल आव्हाड यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रोंदळे तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -