घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये शनिवारपासून तीन दिवसीय गजपंथ अमृत महोत्सव

नाशिकमध्ये शनिवारपासून तीन दिवसीय गजपंथ अमृत महोत्सव

Subscribe

श्री दिगंबर जैन समाजाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमधील गजपंथा सिध्दश्रेत्राला यंदा १३० वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शनिवारपासून (१६ फेब्रुवारी) तीन दिवसीय गजपंथा अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

श्री दिगंबर जैन समाजाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमधील गजपंथा सिध्दश्रेत्राला यंदा १३० वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शनिवारपासून (१६ फेब्रुवारी) तीन दिवसीय गजपंथा अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अहिंसा संस्कार पदयात्रेचे प्रणेता मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज, सौम्यमूर्ती मुनीश्री पीयुषसागरजी यांची विशेष उपस्थिती व दर्शनाचा लाभ जैन बांधवांना घेता येणार आहे.

श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथा ट्रस्टच्या वतीने अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील ३२ राज्यातून ९० हजाराहून अधिक किलोमीटरची अंहिसा संस्कार पदयात्रा करत असलेले मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (१६ फेब्रुवारी) या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

- Advertisement -

महोत्सवात या कार्यक्रमांचा समावेश

  • शनिवार – सकाळी ८.१५ वाजता तीर्थ वंदना, दुपारी २.३० – तीर्थरक्षा संगोष्ठी, सायंकाळी ६.३० आनंदयात्रा व महाआरती, रात्री ८ वाजता – सांस्कृतिक कार्यक्रम.
  • रविवारी – सकाळी ७.३० जिनसहस्रनाम महाअर्चना उत्सव, दुपारी २ – १३० वर्षपूर्ती समारोह सभा, सायंकाळी ६.३० – आनंदयात्रा व महाआरती. रात्री ८ – सांस्कृतिक कार्यक्रम.
  • सोमवारी – सकाळी ८ वाजता सहस्त्र मस्तकाभिषेक, दुपारी ३ – धन्यवाद व आशिर्वाद महोत्सव

मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराजांची कठोर साधना

अहिंसा संस्कार पदयात्रेत सहभागी झालेल्या मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराजांनी पायी ९० हजार किलोमीटर पायी प्रवास केलेला आहे. २०१८ मध्ये अहमदाबाद येथे ६४ दिवस ६४ दिवस अन्न-पाण्याविना उपवास केले. या कालावधीत मुनीश्री मौनात होता. २०१७ मध्ये जयपूर येथे १८६ दिवसाची साधना व मौनव्रत केले. सध्या ते ४८ तासांत एकदाच जेवण आणि पाणी घेतात. त्यांनी देशातील ३० राज्यांतून ९० हजारांहून अधिक पायी प्रवास केला असून, दररोज दोन तास उभे राहून तपश्चर्या करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -