घरताज्या घडामोडीनाशिक विभागीय आयुक्तपदी गमे

नाशिक विभागीय आयुक्तपदी गमे

Subscribe

नाशिक विभागीय आयुक्तपदी नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त राजाराम माने हे आज सेवानिृत्त झाले त्याचदिवशी गमे यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने काढले. गेल्या काही दिवसांपासून विभागीय आयुक्तपदासाठी अनेक अधिकार्‍यांची नावे चर्चेत होती. अखेर शासनाने गमे यांच्या नियुक्तीचे आदेश आज पारित केले.

पाच दिवसांपुर्वीच राधाकृष्ण गमे यांची पदोन्नतीवर बदली करण्यात आली. मात्र त्यांना नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. कार्यकाल पूर्ण होण्याआधीच गमे यांची बदली झाली होती. त्यांच्याजागी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. ६ डिसेंबर २०१८ रोजी गमे यांनी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला होता. त्यांनंतर त्यांनी प्रशासनावर आपली पकड मजबूत करत आपल्या कार्यकाळात विविध उपक्रम राबवले. एकिकडे शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांना आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा कार्यकाळ पुर्णहोण्याआधी त्यांची बदली होणे यामागे राजकिय खेळी असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला. गमे यांनी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहीले होते. त्यांनतर त्यांची बदली उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी पदावर झाली होती. त्यानंतर ते तेथून थेट नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून रूजू झाले. यापूर्वीही त्यांनी मालेगाव प्रांत म्हणून काम पाहीले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकला देशात अकराव्या स्थानी नेण्यासाठी त्यांनी चांगले काम केले तर स्मार्ट शहरात राज्यात पहील्या स्थानी आणून शहराला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. गमे यांची पदोन्नतीवर बदली झाली असली तरी त्यांना नियुक्ती न देण्यात आल्याने विभागीय आयुक्तपदासाठी गमे यांची नियुक्ती होउ शकते असा कयास व्यक्त करण्यात येत होता. अखेर आज शासनाने त्यांना विभागीय आयुक्तपदी नियुक्ती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -