Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक बाप्पा पावले, वाढीव शुल्काचं विघ्न टळलं

बाप्पा पावले, वाढीव शुल्काचं विघ्न टळलं

मंडप उभारणीसाठी आता केवळ १०० रुपये शुल्क द्यावं लागणार

Related Story

- Advertisement -

शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देताना ८८६ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.

या निर्णयाविरोधात संघटित झालेल्या गणेशोत्सव मंडळांनी आज महापौरांच्या रामायण या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यापूर्वी मंडळांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. त्यात मुंबईप्रमाणेच नाशिकमध्येही केवळ १०० रुपये आकारण्यावर एकमत झाल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गणेश मंडळांनी मंडप शुल्क माफीची मागणी केली होती. मात्र, शुल्क भरल्याशिवाय महावितरणने वीज कनेक्शन देऊ नये, असं पत्र महापालिकेने वीज मंडळाला दिलं होतं. त्यावरून महापालिका आणि गणेश मंडळ यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली होती. मात्र, शुल्क कमी झाल्यानं बाप्पांच्या आगमनापूर्वीच विघ्न टळलं.

- Advertisement -