घरमहाराष्ट्रनाशिकपाचोरा येथे सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

पाचोरा येथे सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

Subscribe

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथील एका खासगी रुग्णालयातून काम संपल्यावर घरी जाणार्‍या महिलेचे रिक्षातून अपहरण करत दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली.

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथील एका खासगी रुग्णालयातून काम संपल्यावर घरी जाणार्‍या महिलेचे रिक्षातून अपहरण करत दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत रात्री उशिराने गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दोघा संशयितांना पोलिसांनी सकाळी अटक केली. फिर्यादी महिला १९ एप्रिलला सायंकाळी पाचोरा येथील खासगी रुग्णालयातून काम आटोपून घरी परतत होत्या. महिलेच्या घरासमोरच राहणारा पिंटू उर्फ गोविंद दत्तू पुजारी (३६, रा. हनुमाननगर, ता. पाचोरा) व त्याचा मित्र रिक्षाचालक नुरा फत्तू पटेल (५०, रा. शिवाजीनगर, पाचोरा) यांनी तिला रिक्षामध्ये बसवून तारखेडा रस्त्यावरील एका शेतात नेले व बलात्कार केला. महिलेचे पती, सासू, सासरे बाहेरगावी गेलेले असल्याने रात्री महिलेने हा प्रकार शेजारच्या मंडळींना सांगितला. यानंतर फिर्याद दिली. फिर्यादीवरून शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुसक्या आवळल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -