अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; १५ जणांवर मोक्का

15 people rape on two sisters 6 days in Pakistan

नाशिक : संघटीत टोळी करुन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या १५ जणांवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मोक्का कारवाई केली. यामध्ये एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे. आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
7 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान व 9 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान नाशिकरोड परिसरातील पूजा वाघ हिने स्वत:च्या घरात अल्पवयीन मुलीला बळजबरीने आणले. त्यानंतर तिने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. घरात आधीच असलेल्या सहा आरोपींनी मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार केला. ही बाब मुलीच्या आईला समजली. याप्रकरणी पीडितेच्या आईने १० जानेवारी रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात येत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहाजणांना अटक केली. पोलीस तपासात गुन्हयातील टोळीप्रमुख सुनिल कोळे याने संघटीत गुन्हेगारी करण्यासाठी साथीदारांना बरोबर घेवून टोळी तयार केली. कोळे व त्यांच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार कल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपींची नावे
टोळीप्रमुख सुनिल कोळे, आकाश राजेंद्र गायकवाड (वय 22), रवी उर्फ फॅन्ड्री संतोष कुर्‍हाडे (19), दीपक समाधान खरात (१9), सोमनाथ उर्फ सोम्या विजय खरात (19), पूजा सुनील वाघ (27), अमोल बाळासाहेब शेजुळ (19), रहेमान सुलेमान शेख (33), सायमन पॅट्रीक मॅनवेल, समीर मुस्ताक खान, ताजमुल सलीम शेख, भूषण सुधाकर दोडमल, किशारे गणेश गिरी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.