वणी एसटी स्टॅण्ड परिसरात आलेल्या महिलेवर टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री 1 वाजेदरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री 3 वाजताच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला मित्रासमवेत बुधवारी रात्री वणी एसटी स्टॅण्ड परिसरात आली होती. त्या ठिकाणी मित्राच्या ओळखीचे चौघेजण आले. चौघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर चौघे पळून गेले. ही बाब वणी पोलिसांना समजताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मध्यरात्री 3 वाजता तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. एकजण फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -