रेल्वेत प्रवासी लूट करत टोळक्याचा महिलेवर बलात्कार

लखनौ वरून मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या सी- १ बोगीत लूटमार, बलात्कार,विनयभंग

uttar pradesh bareilly police arrested two accused in gang rape case of 19 year old girl

नाशिकरोड: ईगतपूरी रेल्वे स्टेशनवरुन शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी साडे सहा वाजता पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे जात असतांना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान धावत्या रेल्वेत महिलेवर बलात्कार करुन लूट केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे सुत्रांनी घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस तपास करत असून चार जण ताब्यात घेतल्याचे समजते. ८ शस्त्रधारी दरोडेखोरां कडून सी- १ बोगीतील प्रवाश्याना शस्त्राचा धाक दाखवून लुटले, अनेक प्रवाश्याना मारहाण करण्यात आली तर महिला प्रवाश्याचा विनयभंग करण्यात आला. २० वर्षीय प्रवाशी दरोडेखोरांपैकी काही जणांनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार करून तिचा विनयभंग केला, महिलेची वैद्यकीय तपासणी अहवाल आलेला नसल्याचे सांगत रेल्वे सुत्रांनी सांगितले. कसारा स्थानक येण्यापूर्वी दरोडेखोरांनी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या टाकून अंधारात पसार झाले.

९६ हजाराची लूट करण्यात आली असून त्यात मोबाईल फोन, मौल्यवान वस्तू आणि रोकड असा समावेश आहे.कल्याण रेल्वे पोलिसानी आठ दरोडेखोरांविरुद्ध ३७६(ड) (सामूहिक अत्याचार) , ३५४ (विनयभंग) ३५४, ३९५,३९७ (दरोडा) गुन्हा दाखल करण्यात आला. लूटमार करणारे दरोडेखोर कसारा येथील डोंगराळ भागात राहणारे तरुण आहेत. असून इतर दरोडेखोरांचा कसून शोध सुरू असल्याची महिती पोलीस उपायुक्त (लोहमार्ग) मनोज पाटील यांनी दिली.