Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक हॉटेलच्या किचनमध्ये गॅस स्फोट ; स्वयंपाकीचा मृत्यु

हॉटेलच्या किचनमध्ये गॅस स्फोट ; स्वयंपाकीचा मृत्यु

रामा हेरिटेज येथे घडली घटना, कुटुंबियांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

Related Story

- Advertisement -

नाशिक येथे हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात स्वयंपाकीचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास घडली. रुपेश रामदास गायकवाड (४५) असे या स्वयंपाकीचे नाव आहे. गायकवाड हे जुना मुंबई आग्रा रोडवरील हॉटेल रामा हेरिटेज येथे नोकरी करत होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गायकवाड यांचा मृत्यू घातपात असल्याचा आरोप नातलगांनी केला होता. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पसरले होते.
हॉटेल रामा हेरीटेज येथे रात्री साडे अकराच्या सुमारास गॅस स्फोट झाला.घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्हीची पाहणी केली. स्टोअर रुमध्ये रुपेश गायकवाड सिलींडर नेत होते. तेथील लाईट लावल्यानंतर स्फोट झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गॅसगळती होऊन हा स्फोट झाला व त्यात रुपेश यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. परंतू, रुपेश यांच्या कुटुंबियांनी घातपातामुळे रुपेश यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. घटना घडल्यानंतर आम्हाला मध्यरात्री कळवण्यात आले. तोपर्यंत माहिती लपवण्यात आली. रुपेश हे त्यांच्या कुटूबियांचे कर्ता माणूस असल्याचे नातलगांनी सांगितले. त्यामुळे कुटूंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नातलगांनी केली. यावेळी हॉटेल परिसरात नातलगांनी गर्दी केली होती.

नातलगांना हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज दाखवले आहे. त्यात संशयास्पद काही दिसत नाही. नातलगांचा गैरसमज झाला होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भगीरथ देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबईनाका

- Advertisement -