राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे आज लक्ष्यवेध दिन

पाच दिवसांचा आठवडा करावा या सह अनेक मागण्यांचे निवेदन जिल्ह्याधिकाऱ्यांना सादर

collector ofc
मागण्यांचे निवेदन जिल्ह्याधिकाऱ्यांना सादर

शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंबंधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आज लक्ष्यवेध दिन पाळला. या वेळी जिल्ह्यातील अधिकारी महासंघाने आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे दिले या प्रसंगी अध्यक्ष रामदास खेडकर सहचिटणीस हेमंत जाधव, रमेश शिसव आदी उपस्थिती होते.

या आहेत प्रमुख मागण्या

  • केंद्राप्रमाणे राज्यात ५ दिवसांचा आठवडा करावा.
  • सेवानिवृत्तीचे वय ६० करावे.
  • १ लाख ७५ हजार रीत पदे लवकरात लवकर भरावी.
  • महिला कर्मचाऱ्यांदाथी केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन राजा द्यावी.